आयडिया आणणार स्वस्तातले मस्त मोबाईल


आयडिया सेल्युलर ने शुक्रवारी स्वस्तातले चांगले मोबाईल कंपनी बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी कमी किंमतीत हँडसेट मिळावेत म्हणून हँडसेट उत्पादक कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे समजते. अर्थात हा फोन सबसिडीचा नसेल असेही स्पष्ट केले आहे. रिलायन्स जिओच्या मोफत फोनच्या पार्श्वभूमीवर आयडियाने हा निर्णय घेतला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

आदित्य बिर्ला समुहाच्या या कंपनीचे व्होडाफोनबरोबर विलीनीकरण होत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशु कपानिया या संदर्भात माहिती देताना म्हणाले, कंपनी कमी किंमतीत मोबाईल हँडसेट ग्राहकांना उपलब्ध करून देता यावेत यासाठी काम करत आहे. कोणत्याही मोबाईल हँहसेटची आदर्श किंमत २५०० रूपयांपर्यंत असतेच.

रिलायन्सने कांही दिवसांपूर्वी १५०० रूपये सुरक्षा ठेव घेऊन मोफत फोर जी फोन देण्याची घोषणा केली आहे.
Idea cellular to bring cheap mobiles in market

Leave a Comment