बुलेटिर कस्टम्स कंपनीने रॉयल एनफिल्डच्या मोटरबाईकला असा लूक दिला आहे, की पाहणार्याचे डोळे विस्फारले गेले पाहिजेत. गोल्डन कलरच्या या बाईकचे नामकरण द्रोण असे केले गेले आहे. या बाईकला मॉडिफाय करून असा देखणा लूक देण्यासाठी खूप जणांनी योगदान दिले आहे. ही बाईक संपूर्ण सुटी करून परत वेगळ्या पद्धतीने असेंबल केली गेली आहे. रबर एलिमेंटपासून सुरवात करून स्पोक व्हिलला अॅलॉय व्हील सारखे डिझाईन देण्यापर्यंत ही बाईक बदलली गेली आहे.
गोल्डन लूकची रॉयल एनफिल्ड द्रोण
या बाईकला काळ्या रंगाचे दोन एक्झॉस्ट पाईप वेगळे दिले गेले आहेत. यामुळे बाईक अधिक देखणी दिसते आहे. बाईकचे वजन कमी करण्यासाठी खास प्रयत्न केले गेले आहेत. एलईडी हेडलँपला मॉडर्न लूक दिला गेला आहे.तसेच डस्ट कव्हर दिले गेले आहे. मागची लायसन्स प्लेट स्प्रिंग जवळ आहे व मागचा ब्रेक पेडलने लावता येतो.