मुंबई : लवकरच आपले एक नवीन अॅप सोशल मीडियात महत्त्वाचं अॅप मानले जाणारे व्हॉट्सअॅप लॉन्च करण्याच्या तयारीत असून व्हॉट्सअॅपने अद्याप लॉन्चिंगनंतर कोणतही शुल्क आपल्या वापरकर्त्यांकडून आकारले नाही. पण आता हे नवीन अॅप केवळ व्यावसायिक वापरासाठी असेल अशी माहिती मिळत आहे.
लवकरच आणखी एक अॅप लॉन्च करणार व्हॉट्सअॅप
याबाबत ट्विटरवरील @WABetaInfo या अकाऊंटने दिलेल्या माहितीनुसार आता मध्यम आणि लहान व्यावसायिकांना व्हॉट्सअॅप लक्ष्य करत त्यांच्यासाठी व्यावसायिक सुविधा पुरवण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवे अप अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध असेल. आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी यूझर्सना वेगवेगळे फीचर्सही देण्यात येणार आहेत. सध्या या अॅपचे टेस्टिंग सुरु असून लवकरच हे अॅप लॉन्च केले जाणार आहे.