नवी दिल्ली : आपले नवे उत्पादन ‘कइजाला’ अॅप माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टने अधिकृतरीत्या भारतात लाँच केले आहे. भारतीय आस्थापने तसेच फर्ममधील कर्मचारी कामगारांमध्ये उत्तम समन्वय आणि संवाद प्रस्थापित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘कइजाला’ ही एक उत्पादन केंद्रीत अॅप असून याची निर्मिती मोठय़ा समूहात संवाद आणि दैनंदिन कार्याच्या व्यवस्थापनाच्यादृष्टीने करण्यात आले आहे. हे अॅप २ जी नेटवर्कवरही सहजरीत्या चालू शकते.
मायक्रोसॉफ्टचे लाँच केले ‘कइजाला’ अॅप
मोबाईलवर चालणारे अॅप तसेच डिजिटल स्वरुपात जोडले गेलेल्या आधुनिक कार्यस्थळांना एकमेकांशी जोडणारे कइजाला हे ‘मेड फॉर इंडिया’ उत्पादन असल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनेत महेश्वरी यांनी सांगितले. या अॅपच्या साहाय्याने विविध संघटन, आस्थापने आपल्या संघटनेतील लोकांशी तसेच पुरवठादार, खरेदीदारासारख्या बाहेरील व्यक्तींच्याही संपर्कात राहू शकतात. या अॅपचे मूलभूत संस्करण अँड्रायड तसेच आयओएस प्लॅटफॉर्मवर निशुल्क उपलब्ध आहेत. मात्र सुधारीत संस्करणासाठी मासिक १३० रु शुल्क कंपनी आकारणार आहे. वर्तमानात यस बँक, केंद्रीय विद्यालय संघटन, रीपब्लिक टीव्ही, अपोलो टेलीमेडिसिनकडून याचा वापर सुरू असल्याचे मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आले आहे.