भारतात ३१ जुलैला येणार नोकिया ८


नोकियाचा फ्लॅगशीप नोकिया एट हा प्रिमियर सेगमेंटमधील स्मार्टफोन ३१ जुलैला भारतात लाँच केला जात असल्याचे टेक साईटवर जाहीर केले गेले आहे. जर्मन वेबसाईट विनफ्यूचरने हा हायएंड फोन भारतात साधारण ४३ हजार रूपयांमध्ये उपलब्ध होईल अशी माहिती दिली आहे. चार रंगात हा फोन येईल व त्याला प्रथमच हार्टरेट मॉनिटर दिला गेला असल्याचेही सांगितले जात आहे. ऑगस्टपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल असेही समजते.

हा फोन ४, ६ व ८ जीबी रॅमसह येणार असला तरी भारतात ६ जीबी १२८ जीबी स्टोरेजचे व्हर्जन लाँच केले जाईल असेही सांगितले जात आहे. या फोनला ५.७ इंची डिस्प्ले, टाईप सी पोर्ट, ड्युअल स्पीकर, ड्युल सिम, आयपी ६८ वॉटर रेझिस्टंट, फिंगरप्रिट सेन्सर, स्नॅपड्रॅगनचा ८३५ प्रोसेसर दिला गेला असल्याचेही सांगितले जात आहे. फोनला १३ एमपीचा ड्युल एलईडी फ्लॅशसह कॅमेरा व २२.३ एमपीचा दुसरा कॅमेरा असेल. हा फोन बाजारात अॅपल व समसंगशी स्पर्धा करेल.

Leave a Comment