एटीएममधून २०० च्या नोटा पंधरा दिवसांत मिळणार


चलनातून २ हजार रूपयांची नोट रद्द केली जाणार असल्याचे तसेच या नोटांची छपाई बंद झाल्याची बातमी चर्चेत असतानाच येत्या १५ दिवसांत ग्राहकांना बॅकंाच्या एटीएममधून दोनशे रूपयांच्या नव्या नोटा मिळू शकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ऑगस्ट पासून या नोटा एटीएममधून मिळतील. बँकांना २०० रूपयांच्या नोटांचा पुरवठा सुरू केला गेला असल्याचेही सांगितले जात आहे. बँकांना या नोटा एटीएममध्ये सामील करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या गेल्या आहेत.

नोटबंदी झाल्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटा छापल्या गेल्या त्यानंतर प्रथमच दोनशे रूपयांच्या नोटा छापल्या गेल्या आहेत. मोठ्या नोटा चलनात असल्या की काळा पैसा एकीकडून दुसरीकडे पाठविणे सहजसोपे होते यामुळे मोठ्या मूल्यांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नोटबंदी नंतर १०० रूपये मूल्याच्या ६.५ अब्ज, ५० रूपयांच्या १.८ अब्ज,२० रूपयांच्या ३.१ अब्ज तर दहा रूपयांच्या ५.७ अब्ज नोटा नोव्हेंबरनंतर पुरविल्या गेल्या असल्याचेही समजते.

Leave a Comment