व्होडाफोनने आणली झक्कास ऑफर


मुंबई: इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे रिलायन्स जिओच्या वेगवेगळ्या ऑफर्समध्ये १० महिन्यांनंतरही दणाणलेलेच आहे. इतर कंपन्या अजूनही आपल्या ग्राहकांना रोखून धरण्यासाठी आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन चांगल्या ऑफर्स आणत आहेत. त्यात आता व्होडाफोनने जिओला टक्कर देण्यासाठी एक अशीच झक्कास ऑफर आणली आहे. ते ग्राहकांना ज्यात ७० जीबी ४जी डेटा देणार आहेत.

आपल्या ग्राहकांसाठी व्होडाफोनने एका नव्या ऑफरची घोषणा केली असून व्होडाफोनच्या ग्राहकांना या नव्या ऑफरनुसार अवघ्या २४४ रुपयांमध्ये ७० जीबी ४जी डेटा मिळणार आहे. त्याचबरोबर या ऑफरवर अनलिमिटेड कॉलही करता येणार आहेत. त्यामुळे स्वस्तात जास्त डेटा वापरण्याची संधी व्होडाफोनच्या ग्राहकांना मिळणार आहे. मात्र ही ऑफर मिळवण्यासाठी एक अट आहे.

फक्त नव्या ग्राहकांनाच व्होडाफोनने सुरू केलेली ही ऑफर मिळणार आहे. पहिल्यांदा रिचार्ज केल्यानंतर ७० दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यानंतरच्या रिचार्जवर ३५ दिवसाची वैधता दिली जाणार. व्होडाफोनच्या या नव्या ऑफरनुसार ७० जीबी डेटा मिळणार असला तरी प्रत्येक दिवसासाठी ग्राहकांना १ जीबी पर्यंतचा डेटा वापरता येणार आहे.

Leave a Comment