आता मुलांसाठी देखील सक्तीचे होणार होम सायन्स !


मुंबई – आजवर देशात होम सायन्स हा विषय फक्त मुलींसाठीच असल्याची मान्यता होती. पण स्त्री-पुरूष समानता आता या अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता असून यापुढे होम सायन्स या विषयाचे शिक्षण घेणे मुलांसाठी लवकरच अनिवार्य होण्याची शक्यता आहे. याबाबतचा एक प्रस्ताव महिला व बालकल्याण मंत्रालयाने केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवला आहे.

याबाबत महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिगटाने मंत्रिमंडळाकडे राष्ट्रीय महिला धोरण २०१७ चा मसुदा पाठवला असून या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्यास शाळेमध्ये होम सायन्सचे शिक्षण मुलांसाठी बंधनकारक होईल. स्त्री-पुरूषांच्या कामात बालपणापासूनच भेदभाव व्हायला नको, करसवलती व रोजगाराच्या नवीन संधी महिलांना उपलब्ध करून द्याव्या यासारख्या अनेक सूचनांचा समावेश या प्रस्तावाच्या मसुद्यात आहे.

Leave a Comment