स्कॉटलंड – जिनिअस लोकांचा देश


आकाराने दिल्लीएवढा पण लोकसंख्येच्या बाबतीत दिल्लीच्या एक चतुर्थांश असलेला स्कॉटलंड हा देश जिनिअस लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. या छोट्याशा देशाचे वैशिष्ठ असे की जगातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात या देशाचा कांही ना कांही संबंध आहे. कारण मानवतेच्या कामी येणार्‍या अनेक गोष्टींचा शोध या देशाने लावला आहे. असे शोध लावणार्य यांना जिनिअस असे म्हणतात. इंग्लंडचा शेजारी असलेला हा देश यूके चा भाग आहे.

प्रत्येकाने कधी ना कधी कॅलेंडर अथवा एनसायक्लोपिडीयाचा वापर केलेा असतो, टॉयलेटचा फ्लश, फ्रिज, सायकल वापरलेली असते. या सर्व शोधांसाठी आपल्याला स्कॉटलंडच्या जिनिअस लोकांचे आभार मानावे लागतील. सर्जरीची वेळ आल्यास ती वेदना न होता केली जाणे या तंत्राची देणगी याच देशाने दिली आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॉट याच देशाचा. अर्थशास्त्री अॅडम स्मिथ याच देशाचा. हुषारी व क्रिएटिव्हीटी क्षेत्रात स्कॉटलंडने मिळविलेले यश मोजणे अवघड असल्याचे म्हटले जाते. अर्थात कांही जणांच्या मते या ठिकाणी थंडी प्रचंड असल्याने लोक फारसे घराबाहेर पडत नाहीत व त्यामुळे घरात बसल्याबसल्या काय करायचे म्हणून कांही तरी नवे करायला जातात व त्यातून अनेक शोध लागतात.


स्कॉटलंडची राजधानी एडिंबरो हे एक शांत, सुंदर शहर आहे. येथील गल्ल्या, सूप्त ज्यालामुखी, पुस्तकांची दुकाने रमतगमत पाहावीत. हॅरी पॉटरचा जन्म इथल्याच एलिफंट हाऊस या रेस्टॉरंटमधला. या पुस्तकाची लेखिका जेके रोलिंगला येथेच यशाची चव चाखायला मिळाली. दोन मुलांची जबाबदारी असलेल्या रोलिंगने याच रेस्टॉरंटमध्ये हॅरी पॉटरचे लिखाण करून जगप्रसिद्धी मिळविली. रहस्य लेखक इयान रँकिग, लेडिज डिटेक्टीव्ह सिरीज लिहिणारा अलेक्झांडर मॅकल येथलाच. येथे सिलीकॉन ग्लेन ही हायटेक रिसर्च संस्था असून विज्ञानातील नवनवीन शोध येथे लागले आहेत. एडिंबरोत दरवर्षी भरणार्‍या विज्ञान मेळ्यात ते प्रसिद्ध केले जातात. तसेच येथे दरवर्षी फ्रिंज फेस्टीव्हल हा जगातला सर्वात मोठा कला मेळा भरतो. एडिंबराचा किल्ला व त्यावर महोत्सवा दरम्यान होत अ्रसलेली सैनिकी लुटुपुटीची कवायत आवर्जून पाहायला हवी अशीच असते.

Leave a Comment