मुंबई – आपला जिओफोन फ्री देण्याची घोषणा करत रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना जोरदार झटका दिला. पण अद्याप या फोनच्या हार्डवेअर संदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही. अनेक तर्कवितर्क या फोनच्या फीचर्सबाबत लावले जात होते. पण गॅझेट ३६० ने आता दिलेल्या वृत्तानुसार, जिओफोनमध्ये सिंगल सिमची सुविधा असणार आहे.
जिओचा मोफत फोन खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग ४जी फीचर फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनची बीटा ट्रायल १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. २४ ऑगस्टपासून या फोनची प्री बुकिंग करता येणार आहे. तर ग्राहकांना हा फोन १ सप्टेंबरपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.
केवळ ४जी सपोर्ट जिओफोन करेल आणि याच्या माध्यमातून VoLTE (वॉईस ओव्हर LTE) टेक्नोलॉजीने होईल. देशात जिओ ४जी VoLTE नेटवर्क ऑफर करते आणि याचा अर्थ असा होतो की या फोनमध्ये ग्राहक केवळ जिओचचे सिमकार्ड वापरू शकतील. या फोनमध्ये एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल सारखे सिमकार्ड्स चालणार नाहीत. असे असले तरी एअरटेल लवकरच VoLTE सर्व्हिस लाँन्च करणार आहे. पण जिओ आगामी काळात ड्युअल सिम सपोर्ट करणारा फोन लाँन्च करणार की नाही यासंदर्भात अद्याप काहीही सांगू शकत नाही.