मायक्रोसॉफ्ट विंडोजमधून हद्दपार होणार ‘पेंट’


सॅन फ्रान्सिस्को – लवकरच नव्या टुल्स आणि फिचर्ससह एक नवा अवतार घेऊन मायक्रोसॉफ्ट विंडोज १० चे निर्माते येत आहेत. पण १९८५ पासूनचे फोटो एडिटींगचे मायक्रोसॉफ्ट पेंट हे मात्र या नव्या अपडेटमुळे लवकरच आपला निरोप घेणार आहे.

विंडोज १० चा नवा अपडेट एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये मायक्रोसॉफ्टने नव्या ३ डी पेंटचा अंर्तभाव केला आहे. पण हे पेंट ना जुन्या पेंट सारखे काम करते, ना नव्या अपडेट सारखे दिसते. आता ३२ वर्षीय मायक्रोसॉफ्ट पेंट अधिकृतरित्या विंडोजवरून कधी काढून टाकण्यात येणार आहे, याबाबत अद्याप समजलेले नाही.

Leave a Comment