मायक्रोमॅक्सने लाँच केला YU युनिक २ स्मार्टफोन


मुंबई : YU युनिक २ हा स्मार्टफोन YU टेलिवेंचर आणि मायक्रोमॅक्सने लाँच केला असून ५९९९ रुपये ऐवढी या स्मार्टफोनची किंमत आहे. या फोनची विक्री २७ जुलैला दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन ४जी VoLTE सपोर्टिव्ह असणार आहे.

YU युनिक २ या स्मार्टफोनमध्ये ५ इंच स्क्रिन असून त्याचं रिझ्युलेशन ७२०×१२८० पिक्सल आहे. तसेच यामध्ये गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन असणार आहे. यामध्ये १.३GHz क्वॉड कोअर MT६७३७ प्रोसेसर आहे. यासोबतच २ जीबी रॅमही असणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या नॉगट व्हर्जनवर आधारित असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डने ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यामध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २५०० mAh ऐवढी असून या फोनमध्ये ४जी, ३जी, वाय-फाय, जीपीएस असणार आहे.

Leave a Comment