डीएसके बेनेली ३०२ आर लाँच


डीएसके तर्फे बेनेली ३०२ आर ही स्पोर्टबाईक मंगळवारी भारतात सादर करण्यात आली. या बाईकची किंमत आहे ३ लाख ४८ हजार रूपये. तिला एबीएस फिचर दिले गेले आहे. या बाईकचे बुकींग अगोदरच सुरू झाले होते. २०१६ च्या दिल्लीतील ऑटो शो मध्ये ती सादर केली गेली होती. बीएस फोर इंजिन मानकांनुसार ती तयार केली गेली आहे.

डीएसके मोटो व्हील्सचे शिरीष कुलकर्णी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, ही पहिलीच कंप्लीट सुपरबाईक आहे. मिडसाईज सेंगमेंट मधली ही बाईक तीन रंगात उपलब्ध आहे. या बाईकला ३०० सीसी ट्वीन सिलींडर लिक्वीड कूल इंजिन, ६ स्पीड ट्रान्समिशन दिले गेले असून ती रायडरला चांगला अनुभव देईल. या बाईकवर चार वर्षांची अनलिमिटेड वॉरंटी असून हॅपी सेव्हिंग्ज प्लॅन ऑफरही दिली गेली आहे. त्यानुसार ग्राहकाला कमी किमतीत या बाईकचे मालक होता येईल शिवाय वॉरंटी प्रोटेक्शनही मिळणार आहे.