नवी दिल्ली – आज रामनाथ कोविंद यांनी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर ते ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटवर आले आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्विटरवर ३२ लाख ८० हजार लोकांनी फॉलो केले आहे. रामनाथ कोविंद यांना फॉलो करणाऱ्या नेटिझन्सचा आकडा वाढतच आहे. पण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाच रामनाथ कोविंद यांनी फॉलो केले आहे.
देशाच्या १४व्या राष्ट्रपतींचे ट्विटरवर काही मिनिटांतच लाखो फॉलोअर्स
भारताच्या परंपरेला नेत्यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे ही बाब काही नवी राहिलेली नाही. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक नेते अॅक्टिव्ह आहेत. @rashtrapatibhvn या नावाने राष्ट्रपती भवनातर्फे हे ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेदेखील या ट्विटर हँडलवर अॅक्टिव्ह होते. या ट्विटर हँडलवर आता रामनाथ कोविंद येताच त्यांच्या फॉलोअर्समध्ये लाखोंची वाढ झाली आहे.
महात्मा गांधी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. आम्ही सर्व एक असून एकच राहणार असल्याचे ते म्हणाले. आमच्या देशातील ताकद विविधता ही असून आज संपूर्ण जगात भारताचे महत्व वाढले आहे. संपूर्ण जग आमच्याकडे आशेने पाहत आहे, असे ते म्हणाले. देशातील आदिवासी जो आपल्या पर्यावरणाचे रक्षण करतो तोही एक राष्ट्र निर्माता असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र निर्माणाचा आधार हा राष्ट्रीय गौरव असल्याचे रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.