मुंबई : एका नव्या व्हायरसने फेसबुकवर घुसखोरी केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून तुमच्या मित्रयादीत Mohamed Ali Abdelwahab (मोहम्मद अली अब्दलवहाब) नावाची फेसबुक प्रोफाईल दिसत असेल, तर फेसबुकला रिपोर्ट करा, असा सल्ला दिला जात आहे.
तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये ‘ही’ व्यक्तीतर नाही ना?
गायिका आनंदी जोशी हिची फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आली आहे. जर तुम्ही आनंदीला फॉलो करत असाल किंवा तिच्या फ्रेण्ड लिस्टमध्ये असाल, तर Mohamed Ali Abdelwahab तुमच्या लिस्टमध्ये दिसेल. आनंदीने फेसबुककडे तक्रार केली असून लवकरच त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्याला सुरक्षेच्या कारणास्तव रिपोर्ट/ब्लॉक करण्याचा सल्ला दिला जात आहे. ही प्रोफाईल व्हेरिफाईड (नावापुढील ब्ल्यू टिक) दिसत असल्यामुळे अनेक जण चक्रावले आहेत. या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये इजिप्तचा संदर्भ आढळत आहे.