दीड कोटींहून अधिक ग्राहकांनी केले भीम अॅप डाऊनलोड


नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया ने सोमवारी भीम अॅप डाऊनलोड केलेल्या ग्राहकांची संख्या १ कोटी ६० लाखांवर गेली असल्याचे जाहीर करताना भीपचे नवे व्हर्जन लवकरच लाँच केले जात असल्याचे म्हटले आहे. भीमचे सध्या ४० लाख सक्रीय ग्राहक आहेत. सध्या या अॅपचे १.३ व्हर्जन गुगल प्लेस्टोअर व अॅपल वर उपलब्ध आहे. नवे व्हर्जन १.४ लवकरच आणले जात आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये म्हणजे ३० डिसेंबर २०१६ रोजी हे अॅप सुरू झाले व तेव्हापासून दर महिना यावरून केल्या जाणार्‍या व्यवहारात वाढ नोंदविली गेली आहे. अल्पावधीत १ कोटी ६० लाख ग्राहक म्हणजे कॅशलेस समाजाच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल असल्याचे समजले जात आहे. भीम रेफरल योजनाही सुरू आहे त्यात सध्याचे भीम ग्राहक नवीन लोकांना भीमचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. भीम अॅप सरळ, सुलभ व तत्काळ व्यवहारांसाठी अतिशय उपयुक्त शाबीत झाले आहे.

Leave a Comment