आयडिया व्होडाफोन विलीनीकरणास मंजुरी


दीर्घ काळ चर्चा सुरू असलेल्या आयडिया व व्होडाफोन या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांच्या विलीनीकरणास कॉपिटीशन पॅनलने मंजुरी दिली आहे. टेलिकॉम सेक्टर मधील या दोन कंपन्या एकत्र आल्या तर देशातील हे सर्वांत मोठे व्हेंचर ठरणार आहे. तसेच २३ अब्ज डॉलर्सचा हा व्यवहारही देशातील मोठा व्यवहार म्हणून नोंदविला जाणार आहे.

यापूर्वी मार्च मध्ये टेलिफोन ऑपरेटर आयडिया बोर्डाने व्होडाफोन मर्जरला मंजुरी दिली होती. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तरी सध्या त्यांची हिस्सेदारी बरोबरीची नसेल तर कांही वर्षांनंतर ही हिस्सेदारी बरोबरीची होणार आहे. या दोन कंपन्यांचे मिळून ४० कोटी ग्राहक आहेत. संयुक्त कंपनीचे अध्यक्ष म्हणून कुमारमंगलम बिर्ला हेच असतील. तर सीएफओची नेमणूक व्होडाफोनतर्फे केली जाणार आहे. नव्या कंपनीचा महसूलही ७७५०० कोटींवरून ८० हजार कोटींवर जाणार आहे. सध्या देशात सर्वाधिक ग्राहक संख्या एअरटेलकडे असून त्यांचे २६.३४ कोटी ग्राहक आहेत.

Leave a Comment