बजाज ऑटो करणार दुकातीचे अधिग्रहण


जगभरात दमदार व स्टायलीश बाईक बनविणारी दुकाती बजाज ऑटोसोबत लवकरच नव्या उत्पादनांची निर्मिती करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बजाज ऑटोच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी भागधारकांना कंपनी लवकरच नवीन भागीदारी करत असल्याचे संकेत दिले आहेत. गेले काही दिवस बजाज युरोपियन ब्रँड दुकातीचे अधिग्रहण करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती त्याला या विधानामुळे पुष्टी मिळाली आहे.

राजीव बजाज म्हणाले आमच्या योजनेप्रमाणे सर्व घडले तर येत्या दोन आठवड्यात या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार बजाज दुकाती ब्रँडचे अधिग्रहण करून नवीन आयकॉनिक इंटरनॅशनल ब्रॅड बाजारात लाँच करणार आहे.

Leave a Comment