टोमॅटो व्यापार्‍यांची सुरक्षा रक्षकांसाठी मागणी


देशभरात सध्या टोमॅटेाच्या भावांनी कमाल पातळी गाठल्यामुळे इंदोर येथील ठोक बाजारातील व्यापारी टोमॅटो चोरीस जाऊ नयेत म्हणून सूरक्षा रक्षक पुरविण्याची मागणी करत आहेत. मुंबईत नुकतेच टोमॅटो चोरून नेण्याची घटना घडल्यामुळे हे व्यापारी रक्षक पुरवावेत म्हणून मंडई प्रशासनाकडे मागणी करत आहेत.

अनेकदा टोमॅटोचे भाव कोसळल्यानंतर शेतकरी टोमॅटो रस्त्यांवर फेकून देतात मात्र आता देशभरात टोमॅटोची मंडयातून होणारी आवक घटल्याने भाव गगनाला भिडले आहेत. ठोक बाजारात टोमाटो ७० ते ८० रूपये किलो असून किरकोळ बाजारात त्यांची किंमत १२० रूपये किलोपर्यंत चढली आहे. अहिल्यादेवी फळ भाजी बाजारातील सुभाष नारंग म्हणाले, टोमॅटो चोरीस जातील अशी भीती व्यापार्‍यांत उत्पन्न झाली आहे. मंडईत सुरक्षा रक्षक आहेत मात्र त्यांची संख्या अपुरी असून टोमॅटो चोरी रोखण्यासाठी ते पुरेसे नाहीत असे आमचे म्हणणे आहे.