मुंबई: देशातील मोठी टेलीकॉम कंपनी एअरटेलने रिलायन्स जिओच्या नव्या टेरिफ प्लानला टक्कर देण्यासाठी कंबर कसली असून आपले दोन नवे प्लॅन एअरटेलने आणले आहेत. एका प्लॅनमध्ये २९३ रुपयात यूजर्सला ८४ जीबी डेटा मिळणार आहे. तर ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ जीबी डेटा ८४ दिवसांसाठी मिळणार आहे.
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलच्या दोन नव्या ऑफर
एअरटेलचे हे दोन्ही प्लॅन वेगवेगळे असले तरी यामध्ये डेटा सारखाच मिळणार आहे. पण याच्या कॉलिंगमध्ये फरक असणार आहे. यूजर्सला २९३रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा मिळणार आहे. पण यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग फक्त एअरटेल टू एअरटेल असणार आहे. तर ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ जीबी डेटासह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ८४ दिवसांपर्यंत मिळणार आहे.