फेरारी कंपनीतील कर्मचारी नाही करू शकत फेरारीची खरेदी


जगातील अतिवेगवान सुपरकार मेकर कंपनी फेरारी एका बाबतीत मात्र आपल्या कर्मचार्‍यांना नाराज करण्यासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात कोणत्याही वाहन उद्योगात काम करणारे कर्मचारी आपल्याच कंपनीच्या गाड्या विकत घेण्यास प्राधान्य देत असतात व त्यामागचे सर्वात मोठे कारण असते कर्मचार्‍यांना दिला जाणारा खास डिस्काऊंट. फेरारी असली सुविधा तर देत नाहीच पण त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीची गाडी विकतच घेता येत नाही.

या विषयी माहिती देताना कंपनीचे विपणन अधिकारी म्हणाले आम्ही दरवर्षी आठ हजार गाड्याच तयार करतो. आमच्या ग्राहकांनाच कार मिळण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते तशी आमची मास प्रॉडक्शन आहेत मात्र तरीही मागणी जास्त असल्याने प्रतीक्षा यादी असतेच. त्यामुळे ग्राहकांना नाराज करून आपल्या कर्मचार्‍यांना कार विकण्याचा विचार आम्ही करू शकत नाही. नाही म्हणायला आजपर्यंत फॉर्म्युला वनचे दोघे चालक सबेस्टियन वेटेल व रेक कोकेन या दोघानाच कंपनी कार विकत घेता आली आहे मात्र त्यावर त्यांना कोणताही डिस्काऊंट दिला गेलेला नाही.

कंपनीची आणखी एक प्रथा म्हणजे त्यांच्या ग्राहकांची निवड कंपनीच करते.लिमिटेड एडीशन, हायपर सुपरकार तयार करताना निवडक ग्राहकांनाच खरेदीचे निमंत्रण दिले जाते. फेरारी अपर्टाची विक्री सुरू केल्यानंतर २०० संभावित ग्राहकांनाच खरेदी संदर्भात विचारले गेले व त्या सर्वांनी खरेदीस होकार दिला असेही समजते.

Leave a Comment