भारतात बनणार सुपरकॉम्प्युटर


मोदी सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत भारतात स्वदेशी सुपर काँम्प्युटर बनविण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून तीन टप्प्यात ती पूर्ण केली जाणार आहे. या साठी इलेक्ट्राॅनिक्स व माहिती तंत्रज्ञानाच्या अखत्यारीत काम करणार्‍या पुण्याच्या सीडॅक या विकास संस्थेवर जबाबदारी सोपविली गेली आहे. नॅशनल सुपर काँम्प्युटर मिशन नावाने तयार केलेल्या या योजनेत सुरवातीला दोन टप्प्यात हायस्पीड इंटरनेट स्वीच तसेच कंप्युट नोडस उपकरणांचे डिझाईन व उत्पादन केले जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी ४५०० कोटींचा निधी गतवर्षीच मंजुर केला आहे.

या प्रकारे ५० सुपरकॉम्प्युटर तयार केले जाणार असून ते देशातील वैज्ञानिक संस्थांना दिले जाणार आहेत. प्रथम टप्यात सहा सुपर संगणक बनतील त्यातील ३ आयात केले जातील तर उर्वरित तीनांचे सुटे भाग आणून भारतात असेंबल केले जातील. याच्या डिझाईनची संपूर्ण जबाबदारी सीडॅक वर आहे. यातील चार संगणक बनारस हिंदू आयआयटी, खरगपूर, कानपूर व हैद्राबाद येथे तर बाकी दोन पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड एज्युकेशन रिसर्च संस्था व बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला दिले जाणार आहेत. हे संगणक यावर्षअखेर तयार होतील,

दुसर्‍या टप्यात इंटरनेट स्वीच व नोड उत्पादन सुरू केले जाईल व तिसर्‍या टप्प्यात संपूर्ण संगणक येथे बनविला जाईल. १९८८ मध्येच देशात परम संगणक मिशन सुरू झाले होते व त्यातून परम बनविला गेला होता. गेली काही वर्षे हे काम थांबले आहे.

Leave a Comment