जिओच्या ‘मोफत’ फोनची खासियतच वेगळी


सध्या देशभरात रिलायन्सने लाँच केलेल्या मोफत फोनची चर्चा होत आहे. मुकेश अंबानी यांनी ही घोषणा वार्षिक बैठकीमध्ये केली. फुकटात फोन लाँच करण्याचे रिलायन्स जिओने यावेळी जाहीर केले. टेलिकॉम क्षेत्रात या घोषणेमुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. आता आपण जाणून घेऊयात या ‘मोफत’ फोनबाबतच्या खासियत:

हा फोन लाँच द जिओ फोन या नावाने करण्यात आला आहे. या फोनचे प्री बुकींग २४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याफोनसाठी आधी १५०० रुपये अमानत म्हणून जमा करावे लागणार आहेत. कंपनीचा असा दावा आहे की, हा फोन १०० टक्के ४जी VoLTE फोन आहे.

मुकेश अंबानी यावेळी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजिटल इंडियाचे स्वप्न हा फोन नक्कीच पूर्ण करेल. लोक या फोनच्या माध्यमातून आपले बँक खाते, जन-धन खातेही जोडू शकतात. या वर्षीच्या शेवटपर्यंत हा फोन भारतातच तयार केला जाईल.

जिओच्या या फोनवर अनलिमिटेड डेटाची ऑफर मिळणार आहे. १५३ रुपयाच्या धन धना धन प्लान आणून जिओ फोन यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे. तसेच जिओ नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग नेहमी मोफत असणार आहे.

रिलायन्सचा यूजर बेस हा फोन लाँच झाल्यानंतर मजबूत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या फोनमध्ये जिओ टीव्ही देखील असणार आहे. याशिवाय या फोनमध्ये इंटरनेट टीथिंग्र, व्हिडीओ कॉलिंग यासारखे फीचर्स असणार आहेत. दरम्यान यावेळी मुकेश अंबानी यांनी बोलताना असा दावा केला आहे की, जिओ लाँच झाल्यानंतर मोबाइल इंटरनेट वापरामध्ये भारताने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे.

हा फोन ग्राहकांना अवघ्या पंधराशे रुपयात मिळणार असून. हे पंधराशे रुपये तीन वर्षानंतर ग्राहकाला परत देण्यात येतील. त्याशिवाय रिलायन्स जिओच्या फोनवर अनलिमिटेड डेटा मोफत देण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून या बम्पर ऑफरची सुरूवात होणार आहे. सर्वच भारतीयांना हा फोन ‘फ्री’मध्ये मिळणार असल्याची घोषणा यावेळी अंबानी यांनी केली आहे. सप्टेंबरपर्यंत देशात जिओचे १० हजार सेंटर असतील. जिओ येत्या वर्षभरात भारताच्या ९९ टक्के जनतेपर्यंत पोहचलेली असेल, असा दावाही अंबानींनी यावेळी केला आहे.

Leave a Comment