जिओ 4G फोनची प्री-बुकिंग प्रोसेस झाली सुरू


रिलायन्स जिओच्या 4G फोनची प्री बुकिंग प्रोसेस सुरू झाली असून फक्त नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीची माहिती घेतली जात आहे. ही माहिती दिल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जाईल.

मुकेश अंबानी यांनी कालच रिलायन्सच्या एजीएममध्ये या फोनला लाँच केले. हा फोन फ्री दिला जाणार आहे. सुरक्षा ठेव म्हणून १५०० रुपये जमा करावे लागतील. परंतु ही रक्कम ३ वर्षांनंतर युजरला परत देण्यात येणार आहे.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी जिओच्या ऑफिशियल वेबसाइट http://www.jio.com वर जा. येथे होम पेजवर तुम्हाला जिओ स्मार्टफोनचे बॅनर दिसेल. Keep me posted वर क्लिक करा. यावरून तुम्ही रजिस्ट्रेशन पेजवर पोहोचाल. येथे नाव, सरनेम, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचे डिटेल टाकताच तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जाईल. रजिस्ट्रेशन होताच तुमचा मोबाईल नंबरवर कंपनीकडून एक मेसेजही येईल.

१५ ऑगस्टपासून निवडक ग्राहकांना जिओ फोन बिटा टेस्टिंगसाठी उपलब्ध होईल. २४ ऑगस्टपासून फोनची प्री-बुकिंग सुरू होईल आणि फोन सप्टेंबरपर्यंत युजर्सच्या हातात असेल. मुकेश अंबानींनी म्हटल्याप्रमाणे हा फोन प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिला जाणार आहे.

जिओ सध्या फोन बुक करण्यासाठी फक्त युजरला प्राथमिक माहिती मागत आहे. याद्वारे किती लोक फोन घ्यायला उत्सुक आहेत हे तपासले जात आहे. याची बुकिंग २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. myjio अॅप किंवा जिओ रिटेलरमार्फत फोन प्री-बुक करता येईल. यासाठी बुकिंग करायला उशीर करू नका.

Leave a Comment