जीएसटीमुळे देशातील जनता आणि व्यापार क्षेत्राला फायदा होईल – बजाज


पुणे – सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयावर बजाज ऑटोचे प्रमुख राहुल बजाज यांनी टीका केली आहे, तर वस्तू व सेवा कर लागू करण्यात आल्याने देशातील जनता आणि व्यापार क्षेत्राला फायदा होईल असे त्यांनी म्हटले. राहुल बजाज आपल्या बजाज ऑटो या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गुंतवणूकदारांशी संवाद साधत होते.

काही कारण निश्चलनीकरण करण्यामागे होते, ते पूर्णत्वास गेल्याबाबत अजूनही शंका आहे. एटीएमबाहेर साधारण दोन महिन्यांपर्यंत लोकांच्या लांबलचक रांगा होत्या आणि उद्योगांनाही संघर्ष करावा लागला होता. पंतप्रधान मोदी यांचा नोटाबंदी हा आवडता विषय आहे आणि कोणीही त्यावर टीका करत नाही. नोटाबंदीने सरकारने त्याचा राजकीय फायदा घेतला आहे. आता अर्थशास्त्रज्ञ त्याचे कोणते फायदे अर्थव्यवस्थेवर होणार आहेत याचा अभ्यास करत आहे. मात्र आपल्याला त्याचा कोणताही फायदा दिसत नाही. निश्चलनीकरणाने देशातील समांतर अर्थव्यवस्था संपुष्टात आला याबाबत आपण संशयी आहोत. देशातील काळा पैसा नष्ट करण्यास यश आले आणि अजूनही आरबीआय नोटांची गणती करत आहे असे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी जीएसटी लागू करण्यात आल्याने सरकारची प्रशंसा केली. जीएसटीबरोबर स्थिती पूर्णतः वेगळी आहे. हा देशासाठी निर्णय असून मध्यावधी अथवा दीर्घावधीसाठी त्याचा लाभ होईल. नोटाबंदीने नागरिकांना एका रात्रीत समस्या निर्माण केली होती. जीएसटीमुळे कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत असे आपल्याला वाटते. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दराबाबत आपण असमाधानी आहोत, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment