‘अॅपल’च्या हिजाब इमोजीची प्रणेती आहे ‘ही’ १६ वर्षांची मुलगी


सध्या सोशल मीडियावर एकाच इमोजीची जोरदार चर्चा असून या इमोजीचे काही लोकांनी जबरदस्त कौतुक केले आहे, तर काहींनी या इमोजीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अॅपल कंपनीने काही नवीन इमोजी वर्ल्ड इमोजी डे (१७ जुलै) निमित्त लाँच केल्या होत्या. हिजाब इमोजीचाही त्यात समावेश आहे. हिजाबमध्ये एक इमोजी दाखवण्यात आली आहे. त्यामुळेच या इमोजीची जोरदार चर्चा आहे. पण एका १६ वर्षांच्या मुलीची अॅपलने लाँच केलेल्या या बहुचर्चित हिजाब इमोजीची कल्पना आहे. या मुलीचे नाव रऊफ अलहुमेदी असे आहे. एक इमोजी स्वतःसाठी असावा असे वाटल्यामुळे हिजाब परिधान केलेल्या मुलीचा इमोजी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे रऊफने सांगितले. सध्या जर्मनीत रऊफ राहते पण ती मूळची सौदीची आहे.

रऊफ आणि तिच्या मित्रांनी गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला होता. या मित्रांना स्वतःच्या नावाची काहीतरी ओळख असावी असे वाटले. त्यांनी स्वतःची ओळख म्हणून एकेक इमोजी ठेवायचे असे ठरवले. हिजाब परिधान केलेल्या रऊफला त्याचवेळी आपल्यासाठी काय इमोजी ठेवावे, असा प्रश्न पडला. हिजाब परिधान केलेली इमोजी असावी, अशी कल्पना तिला सुचली. त्यातून अॅपलने लाँच केलेली ‘हिजाब इमोजी’ तयार झाली.

Leave a Comment