पेटीएमची युजरना कॅशबॅक ऐवजी सोन्याची ऑफर


सोनेवेडे असलेल्या भारतीयांसाठी पेटीएम वॉलेटने ग्राहकांना कॅशबॅक ऐवजी सोने देण्याची सुविधा सुरू केली आहे. चीनी अलिबाबाच्या संचलनाखाली असलेल्या पेटीएमने दोन महिन्यांपूर्वी एमएमटीसीपीआयएएमपी यांच्या सहकार्याने सोने विक्री व्यवसाय सुरू केला आहे. तेव्हापासूनच अॅपवरून सोने खरेदी करणार्‍यांची संख्या वाढली असल्याचे व आत्तापर्यंत १७५ किलो सोने विक्री झाल्याचे भारतातील कंपनी हेड कृष्ण हेगडे यांनी सांगितले. ते म्हणाले आता आम्ही देशभरातील सराफांसोबत चर्चा करतो आहोत.

आमचे ग्राहक पेटीएमवरून ट्रान्झॅक्शन केल्यास दिल्या जात असणार्‍या कॅशबॅक ऐवजी सोने खरेदी करू शकतील. या सोन्याचा वापर ते दागिने बनविण्यासाठी करू शकतील व त्यासाठीच देशभरातील सराफांसोबत चर्चा सुरू आहे. वास्तविक कंपनीने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोने विक्री व्यवसाय सुरू केला होता, त्याला चांगले यश मिळाले आहे. गेल्याच महिन्यात सोने विक्रीत दुपटीने वाढ झाली असून आमचे ६० टक्के ग्राहक कॅशबॅक ऐवजी सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहे.

Leave a Comment