निस्सानची अत्याधुनिक लीफ इलेक्ट्रीक कार लवकरच भारतात


निस्सानची लीफ ही अत्याधुनिक इलेक्ट्रीक कार लवकरच ई पेडल या नव्या तंत्रज्ञानासह पेश केली जात असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या कारला प्रो पायलट फिचरही दिले जाणार असून यामुळे चालक ऑटोमेटिक पार्किंग करू शकेल. या दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर केलेली जगातली ही पहिलीच कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ई पेडल तंत्रज्ञानामुळे चालक कारचा स्पीड मेनटेन करू शकेलच पण डोंगररस्त्यांवरीही हवी तेव्हा गाडी थांबवू शकेल व पुन्हा हवी तेव्हा स्टार्ट करू शकेल. त्यासाठी केवळ १ सिंगल स्वीच वापरावा लागेल. हे पेडल अॅक्टीव्हेट ब्रेकींगचे अत्याधुनिक रूप आहे ज्यात कायनेटिक उर्जा करंटमध्ये बदलली जाते. पाच दरवाजे असलेली ही कार जपानमध्ये शोकेस केली गेली होती. अमेरिकेत या कारची मागणी वाढल्यानंतर ती युरोपातही लाँच केली आहे व भारतातही ती लवकरच येत आहे. भारतातील या कारची किंमत साधारण २० लाख रूपयांपर्यंत असेल असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत.

Leave a Comment