कोविंद कन्या स्वाती प्रसिद्धीपासून दूरच


भारताचे नव्याने राष्ट्रपती बनलेले रामनाथ कोविंद यांची कन्या वडीलांच्या प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिली असून स्वाती कोविंद या एअर इंडियामध्ये एअरहोस्टस म्हणून काम करतात. मात्र त्या आपले आडनांव लावत नाहीत. यामुळे त्या राष्ट्रपती कोविंद यांच्या कन्या आहेत याची माहिती खुद्द एअर इंडिया अथवा त्यांच्या सहकर्मचार्‍यांनाही नव्हती. कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ही बाब उजेडात आली व एअरइंडियाने ही बातमी आनंदोत्सव करून साजरी केली.

राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी स्वाती यांनी कामावरून रजा घेतली मात्र ती कशाकरता घेतली आहे याची कोणतीही कल्पना त्यांच्या सहकार्‍यांना नव्हती. कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड होताच स्वाती यांचे कोविंद हे वडील असल्याचे समजले. स्वाती ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका अशा दीर्घ पल्ल्याच्या बोईंग ७७७, ७८७ विमानात हवाई सुंदरी म्हणून काम करतात व त्या एअर इंडियाच्या सर्वात चांगल्या क्रू मेंबरपैकी एक आहेत. राजकीय परिवारातील असूनही त्यांच्या कामावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

स्वाती यांच्या ऑफिशियल रेकॉर्डमध्ये त्यांच्या आईचे नांव सविता व वडीलंाचे नांव आरएन कोविंद असे नोंदविले आहे मात्र त्या आपल्या नावापुढे आडनांव लावत नाहीत. स्वभावाने अतिशय नम्र असलेल्या स्वाती राष्ट्रपतींची कन्या असल्याचे गुरूवारी प्रथमच कळले असे त्यांचे सहकारी सांगतात.

Leave a Comment