जिओचा मोफत फोन बुक करण्यासाठी….


नवी मुंबई : इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओचा बहुप्रतीक्षित व्हॉईस कमांडिंग ४जी फीचर फोन लाँच केला आहे. आज रिलायन्स इंडस्ट्रिजची ४०वी सर्वसाधारण बैठक पार पडली. मुकेश अंबानी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कंपनीच्या ४०व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये जगातील सर्वात स्वस्त ४जी फीचर फोन लाँच केला. १५ ऑगस्टपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

१५ ऑगस्ट रोजी जिओ फोन रोल आऊट होईल. पण या फोनचे प्री बुकिंग २४ ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेल, त्यालाच अगोदर फोन मिळेल.

Leave a Comment