मोफत मिळणार जिओचा ४जी फोन; १५३ रुपये महिना भरून अनलिमिटेड डेटा मिळणार


मुंबई – मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण गरिबांना परवडणाऱ्या ४जी जिओफोनची घोषणा सभेत केली. जगात सर्वात स्वस्त आणि व्हॉईस कमांड स्वीकारणारा हा स्मार्टफोन असेल. हा फोन सगळ्यांना परवडणारा असून भारतातील 22 भाषांशी कनेक्ट आहे. जिओवर १५३ रुपये महिना भरून अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या फोनसाठी १५०० रुपये अमानत रक्कम ठेवायला लागणार असून जी तुम्हाला ३ वर्षांनंतर परत मिळणार आहे. हा फोन टीव्हीशी कनेक्ट करता येईल.

या फोनमध्ये अल्फान्यूमेरिक कीपैड, ४-वे नेव्हीगेशन, कॉम्पैक्ट डिजाइन, २.४ इंच QVGA डिस्प्ले, SD कार्ड स्लॉट, मायक्रोफोन आणि स्पीकर, हेडफोन जॅक, कॉल हिस्ट्री, फोन कॉन्टेक्ट, रिंगटोन, टॉर्चलाइट, एफएम रेडियो देण्यात आले आहे.

गेल्या दहा महिन्यात जिओने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. जिओशी दर सेकंदाला ७ ग्राहक जोडले गेले असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. फेसबूक, व्हाट्सअॅपपेक्षाही जास्त गतीने लोक जिओशी जोडले गेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिओमुळे महिन्याला १२० कोटी जीबी डाटा वापरण्यात आला असून, मोबाईल डाटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकले असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Leave a Comment