नवी दिल्ली – सीएजीच्या अहवालामुळे भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची पोलखोल झाली असून आज संसदेत सीएजी ऑडिट अहवाला ठेवण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन आणि स्टेशनांवर बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे दूषित असतात.
भारतीय रेल्वेतील जेवण खाण्यालायक नाही – सीएजी
नियतकालीन वेळेनंतर पॅकबंद खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी विकण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव अहवालामधून समोर आले आहे. तसेच याठिकाणी अनधिकृत कंपन्यांच्या पाण्याच्या बोटलही विकल्या जात आहेत. रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये अजिबात साफसफाई नसते. ट्रेनमध्ये विकण्यात येणा-या अन्न पदार्थांचे बिल दिले जात नाही. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबतही प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. सीएजी आणि रेल्वेच्या संयुक्त टीमने ७४ स्टेशन्स आणि ८० ट्रेनची पाहणी केली आहे. ट्रेन आणि स्टेशनांवर साफसफाईची बोंबाबोंब असल्याचे या पाहणीदरम्यान निदर्शनास आले आहे.