रोल्स रॉईस फँटम आठ ची झलक दिसली


लग्झरी कार मेकर रोल्स रॉईसने त्यांची २०१८ साली लाँच होत असलेल्या फँटम आठची झलक दाखविली असून ही कार २७ जुलै रोजी ब्रिटनमध्ये द ग्रेट एट फॅटम या कार्यक्रमात ग्लोबली लाँच केली जात आहे. या कारबरोबरच जुन्या जनरेशनच्या फॅटमही शोकेस केल्या जाणार आहेत. त्यात महाराणी एलिझाबेथ दोन यांची फॅटम सिक्स लिमोसीन तसेच लेखक गायक जॉन लेनन यांच्या यलो फॅंटम फाईव्हचाही समावेश असेल असे समजते.

या कारसंदर्भात चीनी वेबसाईटवरील एका ब्रोशरमध्ये फोटो अगोदरच प्रसिद्ध केले होते. आता कंपनीने नव्या टिझरमध्ये एलईडी हेडलँप ची झलक दाखविली आहे. ही कंपनी त्यांची उत्पादने खास करून राज्यप्रमुख, सेलिब्रिटीज, व राजघराण्यांसाठीच बनविते. फॅटम एट ही कंपनीची आत्तापर्यंतच्या मॉडेलमधील सर्वाधिक टॉप असेल. तिच्या डिझाईनमध्ये थोडा बदल केला गेला असून फ्रंट व रियर प्रोफाईल अपडेट केले गेले आहे. या कारला ६.७५ लिटरचे व्ही १२ इंजिन असेल असेही समजते.

Leave a Comment