येथे स्वतः ठाकूरजीच देतात पीकपाण्याचा अंदाज


राजस्थानातील कोटा मध्ये गढ पॅलेस या राजपरिवाराच्या महाल परिसरात असलेले ब्रजनाथ मंदिर म्हणजे लोकांच्या अगाध श्रद्धेचे प्रतीक मानता येईल. एकतर मंदिरातील ठाकूरजी म्हणजे कृष्णाची सेवा खुद्द राजपरिवार करतो हे कारण आहेच पण कोटाच्या सुख समृद्धीचे तसेच पाउसपाण्याचे निर्णय ही ठाकूरची दरवषी देतात अशी येथे श्रद्धा आहे.


दरवर्षी ठाकूरजी यंदा कोणते पीक भरपूर येईल, कोणते कमी येईल व कोणते गतवर्षीप्रमाणेच असेल याचा अंदाज देतात. तसेच पावसाचे मानही सांगतात. त्यासाठी धान्य परिक्षण परंपरा पाळली जाते. ही परिंपरा गेली १५० यर्षे पाळली जात आहे. यात आषाढी पौर्णिमेला सूर्यास्तानंतर देवाची शेजारती केली गेली की तीळ, मका, ज्वारी, धने, सोयाबीन, मूग, उडीद, तंादूळ, शेंगदाणे, चवळी अशी धान्ये प्रमाणात मंदिरात पांढर्‍या कपड्याखाली झाकून ठेवली जातात. दुसरे दिवशी पूजा झाल्यानंतर या धान्यांचे परत एकदा वजन केले जाते. त्यातील कांही धान्यांचे वजन कमी भरते, कांहीचे जास्त भरते तर कांहीच्या वजनात फरक पडत नाही. ज्या धान्याचे वजन कमी त्याचे पीक घटणार, ज्याचे जास्त ते वाढणार व ज्याच्या वजनात फरक नाही ते गतवर्षीप्रमाणेच येणार असे मानले जाते.

या महालाच्या आवारात असलेल्या प्राचीन वेधशाळेतून पावसाचा अंदाज वर्तविला जातो व त्यासाठी कांही ठोकताळे आहेत. हे मंदिर १७७७ साली कोटाचा राजा अर्जुनसिंग यांनी बंाधले आहे.

Leave a Comment