आधार कार्ड आता स्मार्टफोनमध्ये


मुंबई: आजच्या घडीला आधार कार्ड किती महत्वाचे झाले आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. पण अनेकांना आधार कार्ड सोबत घेऊन फिरणे शक्य होत नाही किंवा काही लोक आधार कार्ड विसरतात तर काही लोक ते हरवू नये म्हणून सोबत ठेवत नाही. अशात कुठे गरज पडली तर अनेकांची पंचाईत होते. पण आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड थेट स्मार्टफोनमध्येच ठेवता येणार आहे. कारण UIDAI ने एम आधार (mAadhaar) हे मोबाइल अॅप लाँच केले आहे.

यूजर्सला mAadhaar या अॅपसाठी आपला मोबाइल नंबर UIDAIवर रजिस्टर करणे गरजेचे आहे. तुम्ही हे अ‍ॅप गुगल स्टोरवरून डाऊनलोड केल्यावर अॅपमध्ये आपले नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो देखील असणार आहे. या अॅपमुळे आपल्या स्मार्टफोनमध्येच आधार कार्ड अॅक्सेस करता येणार आहे.

सध्या हे अॅप अँड्रॉईड यूजर्संसाठी लाँच करण्यात आले आहे. लवकरच आयओएस यूजर्ससाठी देखील अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपच्या फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये यूजर आपला बायोमॅट्रिक डेटा आपल्या इच्छेनुसार लॉक आणि अनलॉक करु शकतात.

Leave a Comment