एक तृतीयांश भारतीय पाहतात सार्वजनिक वाय-फायवर पॉर्न


भारतातील तब्बल एक तृतीयांश म्हणजे 31 टक्के लोक सार्वजनिक (मोफत) वाय-फायवर पॉर्न पाहतात, असा धक्कादायक अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. आपण सार्वजनिक वाय-फायवर अश्लील साहित्य शोधतो, याची कबुली या लोकांनी दिली आहे.

नॉर्टन या प्रसिद्ध अँटी-व्हायरस कंपनीने वाय-फायच्या सुरक्षिततेबाबत हे सर्वेक्षण केले आहे. या अहवालानुसार सार्वजनिक किंवा मोफत वाय-फायवर नग्न, अश्लील किंवा त्या प्रकारच्या चित्रफिती पाहिल्या, असे 31 टक्के लोकांनी सांगितले. यातील 44 टक्के लोकांनी स्वतःच्या कामाच्या ठिकाणी, 49 टक्के लोकांनी हॉटेलमध्ये किंवा एयर बीएनबीमध्ये पाहिले आहे.

विशेष म्हणजे असे सार्वजनिक नेटवर्क वापरताना आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित असल्याचे तब्बल 74 टक्के लोकांना वाटत असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले. यातील 48 टक्के वापरकर्त्यांनी वाय-फायच्या मालकाच्या परवानगीवाचून त्याचा वापर केला, त्यापैकी 18 टक्के लोकांनी अंदाजे पासवर्ड वापरला किंवा हॅक केले, असे या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment