केवळ १ रुपयांत शाओमीचा Redmi 4A स्मार्टफोन


नवी दिल्ली – शाओमीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन MI Max 2 लाँन्च केल्यानंतर आता नवा धमाका करणार आहे. आपल्या Anniversary Sale मध्ये कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. २० आणि २१ जुलै दरम्यान हा सेल सुरु राहणार आहे. या फ्लॅश सेलमध्ये ग्राहकांना केवळ १ रुपयात स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.

शाओमीचे भारतात तीन वर्ष पूर्ण झाल्याने हा सेल आयोजित करण्यात आला आहे. केवळ एका रुपयांत या सेलमध्ये Redmi 4A स्मार्टफोन विकत घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहकांना कंपनीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीचे सोशल मीडियात प्रमोशनही करावे लागणार आहे.

कंपनी या सेलमध्ये अनेक वस्तूंवर डिस्काउंट देखील देणार आहे. ग्राहकांना ज्यामध्ये केवळ एक रुपयात स्मार्टफोन व पॉवरबँक यासारख्या वस्तू मिळणार आहेत. रेडमी 4A स्मार्टफोन, वायफाय राउटर २, एम आय VR प्लेयर, 10,000 MAH पावरबँक व सेल्फी स्टीकसारख्या अन्य वस्तू १ रुपयात मिळतील. तसेच MI च्या अन्य वस्तूवर १०० रुपयांपर्यंतची सूट मिळेल. यासोबतच कॅपसूल इयरफोनवर १०० रुपये आणि MI च्या हेडफोन्सवर ३०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. १७९९ रुपयांत मिळणारा MI PRO -HD इअरफोन फक्त १५९९ रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

Leave a Comment