शाओमीचा मी ५ एक्स नव्या ब्रँडखाली येणार


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने त्यांचा मी मॅक्स टू नुकताच लाँच केल्यानंतर पाठोपाठ २६ जुलैला मी ५ एक्स सादर करण्यात येत असल्याची माहिती ट्वीटरवरून दिली आहे. मात्र हा फोन कंपनीच्या नव्या म्हणजे बीबीके इलेक्ट्राॅनिक्स तर्फे सादर केला जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. नव्या ब्रँडखाली सादर होणारा हा कंपनीचा पहिलाच फोन असेल. लीक फोटोनुसार तो गोल्ड, ब्लॅक व रोझ गोल्ड कलरमध्ये येईल व त्याची किंमत साधारण १९ हजार रूपयांपर्यंत असेल.

या फोनचे फोटोही शेअर केले गेले आहेत. त्यानुसार या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. क्वॉलकॉम ६२५ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १२ एमपीचा ड्युअल कॅमेरा फ्लॅशसह तसेच १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा, बॅकसाईडला फिंगरप्रिंट सेन्सर अशी त्याची फिचर्स आहेत. हा फोन बाजारात ओपो व विवो फोनना स्पर्धा करेल.

Leave a Comment