बिलीमोरा वाघई नॅरोगेज रेल्वे झाली १०४ वर्षांची


गुजराथच्या नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा पासून ते वाघई पर्यंत जाणारी बिलिमोरा-वाघई- बिलिमोरा रेल्वे आता १०४ वर्षांची झाली असून आजही या रेल्वेच्या नियमित फेर्‍या होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही नॅरेागेज रेल्वे असून ती बडोद्याच्या सयाजीराव गायकवड या राजाने सुरू केली होती. आता ही रेल्वे पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येते.

१९१३ साली ब्रिटीश सरकारच्या सहाकार्याने सुरू करण्यात आलेली ही रेल्वे तेव्हा बडोदा राज्याच्या मालकीची होती. ६३ किमी अंतर कापणार्‍या या रेल्वेला ९ स्थानके आहेत. बडोदा राज्याला भारताच्या अन्य भागांशी जोडले जावे म्हणून ही गाडी सुरू केली गेली हेाती व सागवान लाकडाच्या वाहतुकीसाठीची तिचा वापर केला जात असे. स्वातंत्र्यानंतर ती पश्चिम रेल्वेच्य अखत्यारीत आली. देशातील बहुतेक सर्व नॅरेा व मीटर गेज रेल्वे ब्रॉडगेजमध्ये बदलल्या गेल्या असल्या तरी ही रेल्वे अजूनही नॅरो गेजवरच आहे. पाच डबे असलेली ही गाडी ताशी २० किमीच्या वेगाने प्रवास करून ६३ किमी चे अंतर साधारण ३ तासात जाते.


या मार्गावर गाडीला अनेक क्रॉसिंग आहेत मात्र तेथे गेटमन नाही. गाडीतील कर्मचारी उतरून येथील गेट बंद करतो व गाडी पुढे केल्यावर पुन्हा उघडतो. दिवसातून दोन वेळा ही गाडी प्रवासासाठी निघते. गाडीचा गार्डच तिकीटे देतो व त्यामुळे रेल्वे पूर्ण भरल्यानंतरच तिचा प्रवास सुरू होतो.या गाडीला आता डिझेल इंजिन दिले गेले आहे व पूर्वीचे स्टीम इंजिन चर्चगेटच्या रेल्ये हेरिटेज संग्रहालयात ठेवले गेले आहे.

Leave a Comment