चलनात छोट्या नोटांचा वापर वाढला- मोदींची रणनिती यशस्वी


गतवर्षी आठ नोव्हेंबर रोजी केंद्राने केलेल्या नेाटबंदीचे चांगले परिणाम आता दिसू लागले असून चलनात कमी मूल्यांच्या नोटांचा वापर लक्षणीयरित्या वाढला असल्याचे स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या कॅशलेस इकॉनॉमी वाढविण्याच्या धोरणास हळू का होईना पण खात्रीने यश मिळते आहे.

स्टेट बँकेच्या डिमोनेटायझेशन अॅन्ड कॅश एफिशियन्सी या अहवालानुसार देशात ५०० व १०० च्या नोटांच्या वापरांचे प्रमाण ८६.३ टक्के होते ते नोटबंदी नंतर ७२.४ वर आले आहे. १ हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर त्याजागी २ हजाराची नोट आणल्यानंतर हे प्रमाण घटले आहे. याचा सर्वाधिक फायदा १०० रूपयांच्या अधिक नोटा वापरात झाला आहे. पूवी या नोटांचे चलनातील प्रमाण ९.६ टक्के होते ते आता २०.३ वर गेले आहे. छोट्या नोटांचा पुरवठा मुबलक केला जात आहे व १० रूपयांपासून १०० रूपयांपर्यंतच्या नोटांचे वापरातील प्रमाण १४ टक्कयांवरून २८ वर गेले आहे. याचाच एक अर्थ असा की व्यवहारात काळा पैसा वापराचे प्रमाण कमी झाले आहे.

सरकार लवकरच २०० रूपयांची नोट चलनात आणत आहे. कारण सिस्टीममध्ये अजूनही ५०० रूपयांच्या ३ ते ४ अब्ज नोटांची छपाई केली गेलेली नाही. ती जागा २०० रूपयाची नोट भरून काढणार आहे. याचा फायदा म्हणजे १० ते २०० रूपये मूल्याच्या अ्रधिक नोटा व्यवहारात राहतील व परिणामी काळा पैसा तयार होण्यास प्रतिबंध होणार आहे.

Leave a Comment