मायक्रोमॅक्सचा ‘कॅनव्हस १’ लाँच


मुंबई: आपल्या कॅनव्हस सीरीजमधील नवा स्मार्टफोन ‘कॅनव्हस १’ मायक्रोमॅक्सने लाँच केला असून ६९९९ रुपये ऐवढी याची किंमत आहे. हा ४जी VoLTE स्मार्टफोन ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनवर मायक्रोमॅक्सने १००-डे रिप्लेसमेंट ऑफरही दिली आहे.

जर या स्मार्टफोनच्या हार्डवेअरमध्ये १०० दिवसांमध्ये काही समस्या उद्भवली तर यूजर्सला कंपनी नवा डिव्हाईस देईल. या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा स्क्रीन असून याचे रेझ्युलेशन ७२०×१२८० पिक्सल आहे. तसेच यामध्ये १.३ GHz क्वॉडकोअर मीडियाडटेक प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम असून १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी २५०० mAh आहे.

Leave a Comment