मास्कोतील जंगल जिम


इच्छा आहे तेथे मार्ग आहे याची प्रचिती एका आशियाई व्यक्तीने रशियातील मास्कोजवळ करून दिली आहे. या व्यक्तीने त्याच्या स्वतःसाठी २०१२ साली मास्कोजवळ असलेल्या छोट्याशा जंगलात व्यायाम करण्याची सुरवात केली व त्यातून जन्म झाला जंगल जिमचा. ही विशेष प्रकारची जिम सभोवतीच्या झाडावृक्षात आहेच पण येथील व्यायामाची साधनेही टाकावू वस्तूंपासून तसेच झाडांपासून तयार केली गेली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम करण्याबरोबरच चांगली प्रकृती असे दोन्ही लाभ यातून मिळत असल्याने अनेक तरूणांसोबतच वृद्ध माणसेही या जिममध्ये येत आहेत.

या जिममधील व्यायाम साधनांसाठी झाडाचे ओंडके, लोखंडी पाईप, दगडे,खराब झालेल्या गाड्यांचे पार्ट, रबरी टायर, रेल्वेची चाके तसेच लाकडांचा वापर करून बनविलेले जिमची मशीन्स वापरली जातात. तिमिरयाजेटस्की पार्क असे या जिमचे नांव असून हे छोटेसे जंगलच आहे.

Leave a Comment