चीनमधील मॉलमध्ये हसबंड स्टोरेज सुविधा


महिला वर्गाची कधी न संपणारी खरेदीची हौस व त्यापायी नवर्‍यांना सतत सामोरे जावे लागणार्‍या कंटाळ्यावर चीनमधील एका मॉलने उपाय शोधला आहे. येथे महिलावर्गासोबत आलेल्या व उगीगच इकडे तिकडे रेंगाळावे लागणार्‍या नवर्‍यांच्या मनोरंजनाची सोय केली गेली आहे. हसबंड स्टोरेज या नावाने कांही खोल्या येथे तयार केल्या गेल्या आहेत. त्यात नवरे मंडळी स्वतःचे मनोरंजन करून घेऊ शकतात व तोपर्यंत बायका त्यांची खरेदी करू शकतात.

कार्यालयातून दमूनभागून आलेल्या नवर्‍याने आपल्याबरोबर खरेदीसाठी चलण्याचा आग्रह बायकोने केला की नवरा हमखास नाही म्हणणार. मग त्यातून वादावादी होणार. हे सर्व हसबंड स्टोरेजमुळे टाळता येणार आहे. नवरेमंडळींसाठी तयार केलेल्या या काचेच्या खोल्यातून खुर्ची, संगणक, व्हिडीओ गेम, गेम पॅड ठेवले गेले आहेत. नवरे ही साधने अगदी मोफत वापरू शकतात. यामुळे त्यांना त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमण्याची संधीही मिळते. ही कल्पना लोकप्रिय ठरली तर मात्र ती सशुल्क राबविली जाईल. या हसबंड स्टोरेजची सोशल मिडीयावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून नवरे मंडळींनी या खोल्या थोड्या मोठ्या कराव्यात तसेच खरेदीप्रिय महिलांकडून शॉपिंगला प्रोत्साहन दिले जात असल्याने त्यांना खरेदीवर काही इन्सेन्टीव्ह द्यावा अशाही मागण्या केल्या जात आहेत.

Leave a Comment