कोडॅकचा एक्त्रा स्मार्टफोन भारतात दाखल


कॅमेरा क्षेत्रात क्रांती घडविणार्‍या कोडॅकने त्यांचा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला असून फ्लिपकार्टवर तो विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. हा फोन अमेरिकन व युरोपिय बाजारात याआधीच दाखल झाला आहे. सुंदर फोटो काढण्यासाठी तसेच मिडीया वापरासाठी हा फोन अत्यंत उपयुक्त आहे. एक्त्रा या नावाने हा फोन बाजारात आला आहे. त्याची किंमत आहे १९९९० रूपये.

कोडॅकच्या मोबाईल डिव्हाईस उत्पादन व विक्री परवाना असलेल्या बुलीट समुहाने हा फोन सादर केला आहे. कंपनीचे सीईओ पीटर स्टीफेन्स म्हणाले हा एक्स्ट्रा स्मार्टफोन आहे. त्याला आरएडब्ल्यूचे समर्थन असून २१ एमपीचा एफ २.० अॅपरचर रियर कॅमेरा, १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा फेस डिटेक्शन ऑटोफोकससह दिला गेला आहे. हेलिओ एक्स २० डेकाकोर प्रोसेसर आहे व अँड्राईड मार्शमेलो ओएस आहे. या फोनला एडिटिंग सॉफ्टवेअर स्नॅपसीडही दिले गेले आहे.

Leave a Comment