चांगले मार्क मिळवून ही मिळाले नाही अॅडमिशन; बनला आधुनिक शेतकरी


तिरूवनंतरपुरम: केरळमधील लीजो जॉय नावाच्या एका विद्यार्थ्याला ‘नो अॅडमिशन’चा फटका बसला असून इयत्ता १२वीच्या परिक्षेत लीजोला थोडेथोडके नव्हे तर, तब्बल ७९.७ टक्के मार्क्स भेटले आहेत. याचाच अर्थ तो प्रथम श्रेणीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. पण, त्याला पूढील शिक्षणासाठी पाचव्या यादीतही प्रवेश न मिळू शकल्यामुळे लीजोने थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. तो आता आधुनिक शेतकरी म्हणून शेती करत आहे. आपल्या फेसबुक पेजवर लीजोने शेतीमध्ये फावड्यासोबत काम करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत आरक्षणाची वाईट पद्धत आहे. याच कारणामुळे आपल्याला शेतीची निवड करावी लागली, अशी पोस्टही त्याने लिहीली आहे.

दरम्यान, तो शेती करावी लागल्याबद्धल जराही दु:खी नाही. अॅडमिशन न मिळाल्यामुळे त्याला जरूर दु:ख आहे. पण शेतकरी होण्याचा आपल्याला गर्व असून, आपण समाजाचे बळी ठरलो म्हणूनच शेतकरी झाल्याचे लीजो सांगतो. तसेच, आरक्षणाच्या धोरणामुळे केवळ ५० टक्के गुण मिळवणाऱ्या आपल्या मित्रांना देखील प्रवेश मिळत असल्याचेही तो आवर्जून नमूद करतो. फेसबुकवर लीजोची ही पोस्ट भलतीच व्हायरल होत आहे.

Leave a Comment