‘रॅम्बो’च्या हिंदीमध्ये रिमेक काम करणार नाही – सिल्व्हस्टर


मी कोणत्याही परिस्थितीत हिंदीमध्ये रिमेक करण्यात येत असलेल्या ‘रॅम्बो’ चित्रपटात काम करणार नाही आहे असे सिल्व्हस्टर स्टेलॉन याने स्पष्ट केले आहे. सिल्व्हस्टर स्टेलॉन हिंदी रॅम्बो चित्रपटात झळकणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी त्याच पार्श्वभुमीवर या निव्वळ अफवा असून आपण अशी कोणतीच कमिटमेंट केले नसल्याचे सांगितले आहे. हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’चा रिमेक करण्यात येणार असून टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारत आहे.

सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी हॉलिवूडच्या उत्कृष्ट अॅक्शन चित्रपटांमध्ये सामील असलेल्या ‘रॅम्बो’ चित्रपटातील मुख्य पात्र साकारले होते. या चित्रपटाचे सिक्वेलही आले. सिल्व्हस्टर स्टेलॉन ‘रॅम्बो’ चित्रपटाचा मुख्य भाग होते. त्यांनी एकट्याच्या खांद्यावर चित्रपट यशस्वी केला होता. या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक करण्याचे बॉलिवूडने ठरवले आहे. टायगर श्रॉफ यावेळी सिल्व्हस्टर स्टेलॉन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.