स्विस राजधानी बर्न मधील झिटग्लॉग घड्याळ


स्वित्झर्लंड हे पर्यटकांचे प्रथमपासूनच आवडते पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ जगभरातील प्रवाशांना पडतेच मात्र या देशाच्या राजधानीतील म्हणजे बर्नमधील ५०० वर्षे जुने घड्याळही पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत या घड्याळ्याची नोंद केली असून या घड्याळावरूनच जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांना त्यांची थिएरी ऑफ रिलेटिव्हीटी सुचली असेही सांगतात. इंजिनिअर मार्टीवो गेली ४० वर्षे या घड्याळाची देखभाल करत आहेत. येणार्‍या पर्यटकांना हे घड्याळ आतून दाखविण्याचे काम तेच करतात व घड्याळाची माहितीही देतात. मात्र या घड्याळ्याच्या टीकटॉक आवाजाने हे बोलणे ऐकणे अनेकदा अशक्य बनते असा अनुभव येतो.


या घड्याळाला अनेक मजेदार गोष्टींनी सजविले गेले आहे. दर तासाने येथे एक कोंबडा बांग देतो. घड्याळाचा लंबक हलेल त्याप्रमाणे त्यावरच्या मूर्ती फिरतात. या घड्याळ्याच्या काट्यांवर सोन्याचा मुलामा दिला गेला आहे. शहराच्या मध्यवस्तीत टॉवरवर हे घड्याळ आहे. शिवाय शहरात पदार्थविज्ञानाचे म्युझियमही आहे. येथे व्हीडीओच्या सहाय्याने पदा्र्थविज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. बर्नवासिय गेली ५०० वर्षे या घड्याळाचे ठोके ऐकत आहेत. त्यावरून त्यांना हे नक्की समजले आहे की वेळ कधी थांबत नाही. त्यामुळे वेळेबरोबर चालण्यातच शहाणपणा आहे. आयुष्य यशस्वी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

Leave a Comment