रॅगिंगला आळा घालणारे अॅप


विद्यापीठे, महाविद्यालयातून नवीन विद्यार्थ्यांना रॅगिंगला सामोरे जावे लागल्यास त्याची त्वरीत तक्रार करता यावी व हा प्रकार करणार्‍या विद्यार्थ्यांना समज मिळावी यासाठी अँटी रॅगिंग मोबाईल अॅप सादर केले गेले आहे. यूजीसीने देशभरातील सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना या संदर्भात माहिती दिली असून ही सेवा १६ जूनपासूनच सुरू केली गेली आहे.वास्तविक रॅगिंग प्रतिबंधक कायदा २००९ मध्येच लागू केला गेला आहे मात्र आजही रॅगिंगच्या तक्रारीत वाढच होत असल्याचे दिसून आले आहे.

या अॅपमुळे रॅगिंग, अथवा अन्य प्रकारच्या छळांना सामोरे जावे लागलेले विद्यार्थी थेट तक्रार नोंदवू शकणार आहेत. ज्या तक्रारी या अॅपच्या माध्यमातून येतील त्यावर यूजीसी स्वतः देखरेख करणार असल्याने असे प्रकार दाबून टाकणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रात अँटी रॅगिंग सेल पुनर्जिवित केला गेला असून त्यासोबत नवीन अॅपची माहितीही सर्व शैक्षणिक संस्थांना दिली गेली आहे. रॅगिंग अथवा अन्य प्रकारच्या छळवणुकीबाबत केली गेलेली तक्रार योग्य असेल तर संबंधितांवर एफआयआर दाखल केला जाणार आहे. सर्व महाविद्यालये व विद्यापीठांच्या नोटिसबोर्डवर या संदर्भात माहिती लावली गेली आहे. जेथे रॅगिंग लपविण्याचा प्रयत्न होईल त्या कॉलेजवरही कारवाई केली जाणार आहे.

Leave a Comment