मेक इन इंडिया अंतर्गत बनणार नोटा सुरक्षा फिचर्स


रिझर्व्ह बँकेने चलनी नोटा सुरक्षा फिचर्स बनविणार्‍या कंपन्यांसाठी नवीन निविदा मागविल्या असून संबंधित कंपन्यांना येत्या दोन वर्षात मेक इन इंडिया अंतर्गत त्यांचा कारखाना सुरू करावा लागणार आहे. या उत्पादन केंद्रांनंतर कंटेट वाढविता येणार आहे. तसेच चीन व पाकिस्तानपासून अंतर राखण्यासाठी या कंपन्यांना त्यांच्या उद्योगात या देशांशी संबंधित भारतीयांना नोकरीवर ठेवता येणार नाही अथवा कंपनीतील भारतीयांना या दोन्ही देशांत पोस्टिंगवरही पाठविता येणार नाही असे समजते.

नोटा सुरक्षा फिचर्सच्या कामात नोटात वापरला जाणारा धागा, रंग, कागद, प्रिटींग डिझाईन यांचा समावेश होतो. या उत्पादन केंद्रात यासाठी लागणारा माल स्थानिक पातळीवरच तयार करावा लागेल. यामुळे बनावट नोटांवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. जी कंपनी यात यशस्वी ठरेल पण त्यांचे चीन व पाकिस्तान देशातही काम सुरू असेल तर त्यांना सूटेबल फायरवॉल बनवावी लागणार आहे. तसेच कंपनीत काम करणार्‍यांत कोणीही पाकिस्तानी वंशाचे नाही याची खात्री द्यावी लागणार आहे.

Leave a Comment