जीएसटीमुळे एफपीआयची भारतीय बाजारात ११,००० कोटींची गुंतवणुक


नवी दिल्ली: देशात कोणत्याही अडचणीशिवाय जीएसटी लागू झाल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषत: विदेशी गुंतवणुकीत सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये विदेशी पोर्टफोलियो असलेल्या गुतवणुकदारांनी (एफपीआय) सुमारे ११,००० कोटी रूपयांची गुंतवणुक केल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये (फेब्रुवारी ते जून) ही गुंतवणुक अनेक कारणांमुळे शुद्ध विदेशी गुंतवणुकीनंतर आली आहे. त्यापूर्वी विदेशी गुंतवणुकदारांनी जानेवारी महिन्यात भारतीय ३४९६ रूपयांची गुंतवणुक काढून घेतली होती.

एनडीटीव्हीने ५ नान्स डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश रोहिरा यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात एफपीआयचे आकर्षण भारतीय भांडवली बाजारात वाढले असून, अर्थव्यवस्थेत तेजी येत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय कोणत्यीही अडचणीशिवाय देशात जीएसटी लागू झाल्यामुळेही गुंतवणुकदार खूश आहेत.

दरम्यान, जगभरातील एकुण अर्थव्यवस्थेवर नजर टाकता येता काळ हा विकासनशिल देशांसाठी प्रचंड उर्जादायी असून, या देशांची आर्थिक सुधारणा गतीमान होण्यीच चिन्हे असल्याचेही संकेत मिळत आहेत. पण, ही चिन्हे भारतीय भांडवली बाजारासमोर काहीशा अडचणीही निर्माण करू शकतात. कारण एफपीआय आपल्या गुंतवणूकिची दिशा बदलूही शकतात.

Leave a Comment